बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

श्रीमहालक्ष्मी व्रत - कथा


हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा
श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची कहाणी )
श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान घरात नांदावे; म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी,सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ध्यानी घ्यावी, अशी ही कहाणी आहे. द्वापार-युगातली. आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली.
तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता प्रजादक्ष होता. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकून आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा-राणीने कन्येचे नाव शामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल; प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले, तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत-टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, "कोण गं बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय ? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली, "माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलेय. कुठे आहे ती? दासी म्हणाली, "राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले, तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब." म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली. "तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्‍नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी-तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणार्‍या श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती, समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्‍नी लक्ष्मी-लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे." म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, " मला सांगाल ते व्रत? मी करीन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही; घेतला वसा टाकणार नाही."
म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार, तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, "कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ? जा इथून." तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती, हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार, तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली, "आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते." राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली. तिने शामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता.
पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले.
लवकरच शामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा-समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव, ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती; ती स्थिती आता बदलली. अन्न-पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे; पण तो तरी काय करणार? एकेक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता.
एक दिवस भद्रश्रवाला वाटले, मुलीकडे जावे, तिला पहावे आणि चार-आठ दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून-चालून तो खूप दमला होता; म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शामबालालाही ते समजले. शामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान-सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली.
भद्रश्रवा परत जायला निघाला, तेव्हा शामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे, हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय? हंड्यात धन नव्हतेच. होते फक्त कोळसे ! महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्र्श्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता.
दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक-एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली. तेव्हा शामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शामबालाने आईकडूनही महालक्ष्मी-व्रत करवून घेतले. चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणुन शामबाला माहेरी आली. पण 'बाप' भेटायला गेला असताना त्याला शामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता; पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही,' हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली.
स्वगृही आल्यावर मालाधराने शामबालेला विचारले, " माहेराहून काय आणलंस?" शामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले, तर हंड्यात मिठाचे खडे ! मालाधराने चकित होत पत्‍नीला विचारले, "हे काय? या मिठाचा काय उपयोग? शामबाला म्हणाली, "थोडं थांबा, म्हणजे कळेलच." त्या दिवशी शामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न-पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. "हा मिठाचा उपयोग!' शामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले
थोडक्यात, जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील.
महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥
ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः


सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१२

शुभ दीपावली

प्रेमगंध अन ऋणानुबंध , असे क्षणाक्षणाला 
चहूकडे सुखाची उधळणं, असे दिवाळी सणाला 

गंध भावनेचा , हा मनामनात वसे, 
घराघरात प्रवेशणारे, लक्ष्मीपावलांचे ठसे,

लखलखते दिवे अन नवचैतन्याची जाण मनाला
चूहकडे सुखाची उधळणं , असे दिवाळी सणाला 





नवा गंध , नवा श्वास,
नव्या रांगोळीची नवी आरास
स्वप्नांतले रंग नवे 
आकाशातले असंख्य दिवे








उजळलाय पणत्यांनी आसमंत 
पसरलाय स्वादिष्ट मिठाईचा सुगंध 
सजलंय नक्षीदार रांगोळ्यांनी अंगण
जपुया हेच अनमोल ऋणानुबंध





प्रत्येक प्रज्वलित दिव्याचे तेज म्हणजेच 
आपल्या प्रत्येकाच्या हृद्यात अविरत
वसणारा विश्वासाचा झरा.
ह्या प्रत्येक दिव्याचे तेज 
आपल्या आयुष्यात सतत प्रेम,शांती,
समृध्दी व सौख्याचा वर्षाव करु दे.




शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१२

जुलिअन असांज


विकिलीक्स ही जगभरातील गोपनीय तसेच गुप्त बातम्या प्रसिद्ध करणारी एक वादग्रस्त विना-नफा संस्था आहे. डिसेंवर २००६ मध्ये स्थापन झालेल्या विकीलीक्सने आपल्या संकेतस्थळाच्या द्वारे आजवर लाखो गुप्त व संवेदनशील सरकारी कागदपत्रे, अहवाल व मेमो प्रकाशित केले आहेत. जुलियन असांज हा विकीलीक्सचा प्रमुख संपादक व प्रवक्ता आहे.
विकीलीक्सचा विकिपीडिया किंवा विकिमीडिया फाउंडेशनशी काहीही संबंध नाही.

स्थापना

विकिलीक्स ची स्थापना अंसाज यांनी 4 ऑक्टोबर 2006 रोजी केली. प्रथम "विकी" (कोणी पण संपादित करू शकेल अशी) वेबसाइट 2010 पासून वेगळी करण्यात आली. आधी कोणी पण विकिलीक्स संपादित करू शकत होते, सध्या 2010 नंतर ही प्रणाली बदलण्यात आली आहे. अमेरिकेचे गुप्त कागदपत्रे प्रससिद्ध करणे - या कार्य मुळे ही संगठणा कमी वेळेत जास्त प्रभावी ठरली. अमेरिकेची इराक मधील अमानुष कारवाईचे चित्रफिती या संगठनेने इंटरनेट वर प्रसारित केल्या , त्यामुळे संगठनेस लोकांचा पाठिंबा मिळत राहिला.

जुलियन असांज (इंग्लिशJulian Assange; जन्मः ३ जुलै १९७१) हा एक ऑस्ट्रेलियन पत्रकार, संपादक व चळवळवादी आहे. असांज हा विकीलीक्स ह्या गुप्त कागदपत्रेइंटरनेटवर प्रकाशित करणार्‍या संकेतस्थळाचा मुख्य संपादक व प्रवक्ता आहे. आजवर असांजच्या नेतृत्वाखाली विकीलीक्सने लाखो गुप्त सरकारी अहवाल, मेमो व संवेदनशील कागदपत्रे खुली केली आहेत. ह्यांमध्ये अमेरिकेच्या इराक व अफगाणिस्तानमधील युद्धांबाबत अनेक दस्तावेजांचा समावेश आहे. २८ नोव्हेंबर २०१० रोजी विकीलीक्सने अमेरिकेच्या परराष्ट्रीय खात्याने व जगभरातील अमेरिकन राजदूतांनी लिहिलेली अत्यंत गुप्त अहवाल प्रकाशित करण्यास सुरुवात केली. ह्यामुळे असांजने अमेरिकेसोबत जगभरातील अनेक देशांचा रोष ओढवून घेतला आहे.

आयुष्य

असांज यांचा जन्म क्वीन्सलँड मध्ये झाला. त्यांच्या सावत्र वडिलांच्या म्हणन्यानुसार ते लहानपणा पासूनच हुशार होते, व त्यांना "काय बरोबर आहे व काय चूक आहे" याची जाणीव फार लहान वयात आली होती.
आजवर असांज अनेक देशांमध्ये राहिला आहे. ऑगस्ट २०१० मध्ये स्वीडनने असांजवर एका महिलेचा बलात्कार केल्याबद्दल खटला भरला व असांजला फरारी घोषित केले व असांजला स्वीडनमध्ये परतण्याचा आदेश दिला. ३० नोव्हेंबर २०१० रोजी इंटरपोल ह्या आंतरराष्ट्रीय पोलिस संस्थेने असांजवर अटक वॉरंट लागू केला व ७ डिसेंबर २०१० रोजी त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आले. आपल्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावला गेला आहे अशी असांजची भुमिका आहे.


रसग्रहण : व्हच्र्युअल ते रिअ‍ॅलिटी!Bookmark and SharePrintE-mail
alt
सुचिता देशपांडे , रविवार , ३ जून २०१२
स्वत:च्या ताकदीवर बिनचूक माहिती उघड करण्याचे आव्हान पेलत बलाढय़ महासत्तांना हादरे देणारा जुलियन असांज याचे ‘विकिलीक्स’ हे मूळ आत्मकथन जेव्हा प्रकाशित झाले, तेव्हा त्यातल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे आणि व्यक्त केलेल्या ठाम मतांमुळे या पुस्तकाद्वारे आपल्या आयुष्याबद्दल आणि विकिलीक्सच्या कामाबद्दल सांगत स्वतची बाजू मांडली आहे. या त्याच्या आत्मकथनाचा ज्येष्ठ पत्रकार सुहास फडके यांनी केलेला मराठी अनुवाद अलीकडेच अमेय प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला आहे.
एखाद्या घटनेची योग्य-अयोग्यता, तिची नैतिक, कायदेशीर बाजू याकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यक्तिसापेक्ष असतो. हे पुस्तक वाचताना अनेकदा हे द्विधा प्रश्न उभे राहतात. सत्ताधाऱ्यांचे महत्त्वाचे निर्णय गोपनीय असावेत, यावर त्या विशिष्ट व्यवस्थेचा भर असतो. अशा वेळेस तंत्रज्ञान क्रांतीच्या साहाय्याने कॉम्प्युटर सिस्टीममध्ये घुसखोरी करत त्या निर्णयांमागचा सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा उघड करणाऱ्या जुलियन असांजला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं का? आणि या सिस्टीममध्ये घुसूनही कुठलाही आर्थिक  घोटाळा न केल्याचा दावा असांजने केला, तरी एखाद्या व्यक्तीने बडय़ा कंपन्याच्या, देशोदेशींच्या संरक्षण मंत्रालयांच्या कॉप्युटर सिस्टीममध्ये मुशाफिरी करून गोपनीय मजकूर मिळवणे कितपत योग्य ठरते? अशा वेळेस एखाद्या कृत्याचा अंतिम परिणाम आणि त्याची व्याप्ती मोलाची की, या सगळ्याची उकल करण्याचा मार्गही महत्त्वाचा, हा प्रश्न घोंघावत राहतो.
टीनएज वयात गंमत म्हणून जुलियनने हॅकिंग सुरू केले आणि जग बदलायचेय, या निष्कर्षांप्रत तो पोहोचला. कोणत्यातरी विशिष्ट संस्थेसाठी, संघटनेसाठी नव्हे, तर सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी यंत्रणा असायला हवी, असे त्याला वाटू लागले. मेलबर्न आणि नंतर न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ क्वान्टम मेकॅनिक्सचा अभ्यास करताना सत्याचा शोध आणि न्यायाची शक्यता हे नाते किती गुंतागुंतीचे असत, याचा अदमास तो घेऊ लागला. चळवळी आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्र येण्यातून सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणता येण्याचे मनसुबे तो तयार करू लागला.
कॉम्प्युटर तंत्रज्ञानाने जगभरच्या सर्व देशांना समान पातळीवर आणले. जगाच्या कानाकोपऱ्यांतील देश यामुळे मुख्य प्रवाहाशी जोडले गेले. १६व्या वर्षी कॉम्प्युटर विश्वात डोकावल्यानंतर जुलियन असांज त्यात अवघा बुडून गेला. बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि कॉम्प्युटरमधील रुची असलेल्या या टीनएजरने केवळ गंमत आणि चुरस म्हणून अल्पावधीतच कोड ब्रेक करणे, सांकेतिक भाषा उलगडणे, प्रोग्राम लिहिणे सुरू केले.
जुलियनच्या मते, कॉम्प्युटर क्रांतीमुळे होणारी नवनिर्मिती आणि कॉम्प्युटर सिस्टीम उभारणाऱ्यांची विचारप्रक्रिया समजून घेणे हा त्याचा हॅकिंग करण्यामागील उद्देश होता. नंतर मात्र त्याला याद्वारे स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सत्ताधारी काय करतात, हे समजून घेण्याची संधी मिळाली आणि मग गोपनीय माहिती मिळवून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा तडाखा त्याने सुरू केला. हे करताना कृष्णकृत्याचे सत्य बाहेर पडू नये, म्हणून गुप्ततेचा आश्रय घेणाऱ्या सरकार, संस्था यांच्याविरुद्ध आम्ही लढत आहोत, अशी भूमिका त्याने घेतली. मात्र हॅकिंगकरवी रक्कम वळती करणे, व्यापारी रहस्य विकणे, असले निंदनीय कृत्य त्याने कधी केले नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.
त्याने इराक आणि अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेने किती क्रौर्य दाखवले, हे जगापुढे आणले. केनिया, आफ्रिका, इजिप्त, मलेशिया, इराण या देशांमधील अराजकता, कोसळू लागलेली आइसलँडची अर्थव्यवस्था या सगळ्याच्या मुळापर्यंत तो पोहोचला. विकिलीक्स ही संघटना ‘विचार जगाचा, कृती जागतिक’ करणारी ठरू शकते का, याचा सर्वतोपरी आणि स्वत:च्या ताकदीवर पाठपुरावा केला. त्याच्यावर धाड पडली, त्यानंतर असांजविरुद्ध आरोपपत्र दाखल होणे आणि खटला सुरू होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागला. त्या दरम्यान सिस्टीम्सची सुरक्षितता तपासण्यासाठी हॅक करण्याचे कंपन्यांनी सोपवलेली कामगिरी त्याने पूर्ण केली, अल्पवयीन लैंगिक शोषण करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणाऱ्या टोळीचा माग काढण्यात त्याने पोलिसांना मदत केली.
खटला चालू असताना त्याची झालेली विमनस्क अवस्थाही या पुस्तकाद्वारे समजून घेण्यास मदत होते. माणसे जोडण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात असताना कोणाशीही संवाद साधता न येणं, हा भयंकर अनुभव काय असतो, याचे चित्रण यात आहे.
या पुस्तकातील त्याच्या बालपणाविषयीच्या प्रकरणातून स्वभावातील बंडखोरी, लढाऊ वृत्ती, या सगळ्याचे बाळकडू त्याला त्याच्या आईकडून मिळाल्याचे स्पष्ट होते. त्याचे सावत्र बाबा ब्रेट हे नाटय़कर्मी होते. सारा रंगमंच उभारणे आणि प्रयोग संपल्यावर कमीत कमी वेळात गुंडाळणे ही त्यांच्याकडून शिकलेली गोष्ट जुलियनच्या भविष्यातील विकिलीक्सच्या तयारीत महत्त्वाची ठरली, हेही वाचकाला जाणवते.
हे नवे तंत्रज्ञान निव्वळ बडय़ा उद्योगांच्या आणि सत्ताधाऱ्यांचे लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे हत्यार बनणार नाही, याची काळजी हॅकर्सनी घेतली, असे त्याने पुस्तकात नमूद केले आहे.   यातून कॉम्प्युटर तंत्रज्ञान हे सामाजिक बदलातील एक प्रमुख हत्यार असू शकते, यावर असलेला त्याचा विश्वास दिसून येतो आणि यातच विकिलीक्सच्या जडणघडणीचे मूळ दडलेले आहे.
कट रचणाऱ्या शक्तींना वेळीच रोखून त्यांना लोकांसमोर उघडे करणे हा विकिलीक्सचा प्रमुख अजेंडा राहिला. विकिलीक्सने बाहेर काढलेल्या मोठमोठय़ा प्रकरणांमध्ये बडय़ा वृत्तपत्र समूहांच्या बदलत्या भूमिका, दोषारोप असलेल्या व्यवस्थेला प्रतिप्रश्न न करण्याचा वृत्तपत्रांनी दाखवलेला पळपुटेपणा याबद्दलही या पुस्तकात ओघाने लिहिले आहे.
जुलियन असांजला ज्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले होते, त्या नॉरफोक येथे ध्वनिमुद्रित मुलाखतींद्वारे हे पुस्तक लिहिले गेले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचताना हेही प्रकर्षांने जाणवतं की, हा निव्वळ अनुवाद नव्हे, त्यामागे घटनाक्रम, जागतिक राजकारण आणि हे सारे सोप्या पद्धतीने वाचकापर्यंत पोहोचविण्याची हातोटीही गरजेची आहे. या सर्व गोष्टी साधल्या गेल्याने सुहास फडके यांनी केलेला हा अनुवाद आणि त्यामुळे ते पुस्तक प्रवाही बनले आहे.
एकूणच, जुलियन असांजचे हे आत्मकथन असले तरी वाचकाचे मन केवळ त्याच्यावर एकवटत नाही, तर संगणक क्रांती, बलाढय़ देशांचा अप्पलपोटेपणा, व्यवस्थेचा पर्दाफाश करणाऱ्याला चिरडण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे जंगजंग पछाडणे या कल्पनेपलीकडच्या कठोर वास्तवापाशी भिरभिरते. आणि म्हणूनच कदाचित बलाढय़ व्यवस्थेशी टक्कर देणारा सर्वसामान्यांचा एक प्रतिनिधी म्हणून वाचकांची सहानुभूती मिळविण्यात तो यशस्वी ठरतो.
विकिलीक्स - जुलियन असांज, अनुवाद - सुहास फडके, अमेय प्रकाशन, पृष्ठे २१२, मूल्य रु. २२५ 

[संपादन]विकीलिक्स

असांज यांनी 4 ऑक्टोबर 2006 रोजी विकिलीक्स ची स्थापना केली. विकिलीक्स ही आंतराष्ट्रीय "ना नफा ना तोटा" तत्वावर चालणारी प्रभावी संगठणा आहे. अमेरिकेचे गुप्त कागदपत्रे प्रससिद्ध करणे - या कार्य मुळे ही संगठणा कमी वेळेत जास्त प्रभावी ठरली. अमेरिकेची इराक मधील अमानुष कारवाईचे चित्रफिती या संगठनेने इंटरनेट वर प्रसारित केल्या , त्यामुळे संगठनेस लोकांचा पाठिंबा मिळत राहिला. सरकारी "गुप्त" कागदपत्रे प्रसारित केल्यामुळे असांज हे नेहमीच वेगळ्या वेगळ्या सरकारी यंत्रणेच्या नजरेत असतात.रिकेसोबत जगभरातील अनेक देशांचा रोष ओढवून घेतला आहे.


विकिलीक्स आणि भारत

E-mailPrintPDF
जगभरात कुठेही कार्यालय नसलेल्या, पण जगभरातील अनेक पत्रकार, गणितज्ज्ञ व तंत्रज्ञ यांचा सहभाग असलेल्या आणि "We open governments' हे घोषवाक्य असलेल्या विकिलीक्सने 2007 पासून अमेरिका आणि पाश्चात जगातील काही कागदपत्रे प्रसिद्ध करुन खळबळ माजवली. मात्र, गेल्या वर्षभरात ‘द गार्डियन’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द स्पीगेल’, ‘ल मॉंद’ या वृत्तपत्रांनी विकिलीक्सची कागदपत्रे प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे.
भारतातील वृत्तपत्रीय नीतीमूल्ये पाळणारा, विश्वासार्हता जपणारा, समाजमनावर प्रभाव असणारा, राज्यकर्त्यांवर दबाव टाकणारा आणि तरीही व्यावसायिक दृष्टीने प्रचंड यशस्वी झालेल्या ‘द हिंदू’ या दैनिकाने भारतासंबंधी विकिलीक्सकडून  मिळालेले पाच हजारांहून अधिक केबल्स (लखोटे) प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे. ‘हिंदू’ने त्यांच्याकडील 5100 पैकी पहिल्या दिवशी 40 केबल्स प्रसिद्ध केल्या. त्यात जुलै 2008 मध्ये मनमोहन सिंग सरकारवर आलेल्या विेशासदर्शक ठरावाच्यावेळी सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षाच्या काही खासदारांना दिलेली  कथित लाच आणि त्यासंदर्भात भारतातील अमेरिकन वकिलातीच्या अधिकार्यांनी अमेरिकन सरकारला कळवलेले संदेश अशी माहिती पुढे आली आहे. त्यानंतर केंद्रातील कॉंग्रेसप्रणित आघाडी सरकारची गोची झाली. पंतप्रधानांनी तर यासंदर्भात थेट मला काही माहित नाही, असे सांगितले. आणि नंतर हे आरोप फेटाळून लावले.
भारतासंबंधीच्या केबल्सबाबत ज्युलियन असांजने दिलेल्या मुलाखतीत   "Cables are authentic but the contents of the cables may not be correct. They need to be investigated, interrogated.'' असे म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी या केबल्स राजदूतांनी त्यांच्या देशांना पाठविलेल्या आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे, असंही स्पष्ट केलं.
 विकिलीक्सच्या गौप्यस्फोटात भारत आणि पाकिस्तानबाबतचीही माहिती उजेडात आली आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची भारताविषयीची काय भूमिका आहे. अमेरिका भारताला सापत्नभावाची वागणूक देताना पाकिस्तानला कसे आर्थिक सहकार्य करते, याचाही विकिलीक्सने पर्दाफाश केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिकेचा मित्र असलेला पाकिस्तान प्रत्यक्षात अमेरिकेने दिलेली आर्थिक मदत भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी वापरतो. अफगानिस्तानातही पाक सैन्य आणि आयएसआय संघटना तालिबानी शक्तींना कशा मदत करतात, याबाबतचे पाकिस्तानातले तत्कालीन राजदूत एनी पॅटरसन यांनी अमेरिकी परराष्ट्र खात्याला पाठवलेली गुप्त तार विकिलीक्सने प्रसिद्ध केली. त्यावरुन पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय पातळीवर बुरखा फाटला. पाकिस्तानबाबत भारत अनेक वर्षांपासून जे काही सांगतो आहे, ते कसे बरोबर आहे, यावरही शिक्कामोर्तब झाले. जगात सर्वात वेगाने अण्वस्त्र निर्मिती करण्याची क्षमता पाकिस्तानकडे असल्याचे विकिलीक्सने म्हटले आहे. पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडली तर दहशतवादी ती केव्हाही भारताच्या विरोधात वापरू शकतात, याची ब्रिटन-अमेरिकेला भीती असल्याचेही या दोन देशांमधल्या परराष्ट्र खात्यांच्या तारा विकिलीक्सने प्रसिद्ध करून उघड केले. सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतावर लक्ष ठेवा, असे परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिटंन यांनी त्यांच्या गुप्तचर विभागाला सांगितले आहे, हेही विकिलीक्सने उघड केले. त्यामुळे क्लिटंन दाम्पत्य भारताचे मित्र आहेत, ही भारताची समजूत कशी चुकीची आहे, हेही स्पष्ट झाले.
 26/11 नंतर भारत पाकिस्तानवर हल्ला करेल, अशी भीती ब्रिटनला वाटत होती. हे या केबलने उघड केले. राहुल गांधी यांनी लष्करी तोयबाच्या धोक्याप्रमाणेच हिंदू मूलतत्त्ववादी संघटनांचा देशाला धोका असल्याचे अमेरिकन दुतावासास सांगितल्याचे उघड झाल्यानंतर कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. प्रकाश करात हे त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षातर्फे केंद्र सरकारवर दबाव आणतात हे प्रसिद्ध झाल्यावर विकिलीक्स भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करतो, असा आरोप प्रकाश करात यांनी केला. 26/11 च्या हल्ल²यानंतर कॉंग्रेसने धर्माचे राजकारण केले. हेही विकिलीक्सच्या नवीन केबलने उघड झाले. अमेरिकेचे तत्कालिन राजदूत डेव्हिड मलफोर्ड यांनी 23 डिसेंबर 2008 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला लिहिलेले गोपनीय पत्र विकिलीक्सने प्रसिद्ध केले.
ज्युलिअन असांजे उच्च तांत्रिक दहशतवादी?
वॉशिंग्टन - अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे फोडणा-या विकिलीक्सचा संस्थापक ज्युलिअन असांजे याला उच्च तांत्रिक दहशतवादी ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. या कागदपत्रांमुळे जगभर नाचक्की अमेरिकेने मात्र अद्याप त्याच्यावर कोणते आरोप ठेवायचे, याचा निर्णय घेतलेला नाही, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन यांनी सांगितले.
 
अमेरिकेच्या एनबीसी या दूरचित्रवाणी वाहिनीच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना बिडेन म्हणाले, की असांजे याने अमेरिकेचे मोठे नुकसान केले असून, इभ्रत धुळीस मिळविली आहे. एवढेच नाही तर जगभरात पसरलेल्या अनेक अमेरिकी नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्याशिवाय अमेरिकी उद्योजकांनाही नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
 
असंख्य कागदपत्रे उघड झाल्याने, मित्र देशांशी असलेल्या संबंधावरही विरपित परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे, असे सांगून बिडेन म्हणाले, की अमेरिकी नेते जगभरातील विविध नेत्यांची भेट घेत असतात. त्यांच्यातील चर्चा गोपनीय स्वरूपाची असते. या चर्चेचा तपशिल उघड झाल्यास, किती गोंधळ उडेल याची कल्पनाच केलेली बरी.
 


सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

मोहनदास करमचंद गांधी



जन्म:ऑक्टोबर २, १८६९
पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत
मृत्यू:जानेवारी ३०, १९४८
नवी दिल्ली, भारत
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:अखिल भारतीय काँग्रेस
प्रमुख स्मारके:राजघाट
धर्म:हिंदू
प्रभाव:ल्येव तलस्तोय
गोपाळ कृष्ण गोखले
पत्नी:कस्तुरबा गांधी
अपत्ये:हरीलाल
मणिलाल
रामदास
देवदास



मोहनदास करमचंद गांधी : (ऑक्टोबर २, १८६९ - जानेवारी ३०, १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे 'महान आत्मा'. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. ते सत्याग्रहाचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सुत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, स्त्रीयांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. यासाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.
गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला आणि स्वत:पण याच तत्त्वांनुसार जगले. स्वत: कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी जन्मभर शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा धार्मिक कारणांसाठी तसेच विरोधाचे साधन म्हणून दीर्घ उपवास केले.

अनुक्रमणिका :

  •  सुरुवातीचा काळ
  •  दक्षिण आफ्रिका
  •  स्वातंत्र्यसंग्राम
    • ३.१ चंपारण आणि खेडा
    • ३.२ असहकार
    • ३.३ स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह
    • ३.४ दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन
    • ३.५ स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी
  •  मृत्यू
  •  गांधीजींची तत्त्वे
    • ५.१ सत्य
    • ५.२ अहिंसा
    • ५.३ स्वदेशी
    • ५.४ शाकाहार
  •  लिखित पुस्तके
    • ६.१ गांधीजींवरील पुस्तके
  •  गांधीजींवरील चित्रपट
  •  संदर्भ  
महात्मा गांधी इंग्लंड मध्ये
गांधीजींचा जन्म ऑक्टोबर २, १८६९ या दिवशी सद्ध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी पोरबंदरमध्ये (जे तेव्हा काठिवाड प्रांतात होते) दिवाण होते. पुतळीबाई या त्यांच्या चौथ्या पत्नी होत्या. करमचंद हिंदु मोध समाजातील होते तर पुतळीबाई वैश्णव समाजातील. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषत: अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले.
१८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या.  १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षाचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- १८८८ मध्ये हरीलाल, १८९२ मध्ये मणिलाल, १८९७ मध्ये रामदास आणि १९०० मध्ये देवदास.
त्यांच्या पोरबंदरमधील प्रार्थमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. ते मॅट्रीकची परिक्षा भावनगरमधील सामलदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले आणि तेथे असतांना, त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेबद्दल ते नाखुश होते. शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन मधून वकीलीचे शिक्षण घेण्यास गेले. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला आपण मांस, बाई व बाटली (दारू) यापासून दूर राहू असे वचन दिले होते, त्याचे त्यांनी तिथे पालन केले. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या अध्यक्षपदी पोहोचले. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले.

 


 
एका मित्राने त्यांना खटला लढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला बोलावले. दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यावर गांधीजींनी तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली.प्रथम वर्गाचे तिकिट असतांनासुद्धा त्यांना पिटरमारित्झबर्गमध्ये रेल्वे अधिकार्‍यांनी तृतीय वर्गाच्या डब्ब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी नकार देताच त्यांना रेल्वे मधून ढकलून देण्यात आले. नंतरसुद्धा युरोपीयन प्रवाशांना वाट न दिल्यामुळे रेल्वे चालकाने त्यांना मारले. पूर्ण प्रवासात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून देण्यात आले. अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे, डर्बनमध्ये न्यायाधिशाने त्यांना त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकुम दिला. गांधीजींनी तेव्हाही नकार दिला. या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यार्‍या ठरल्या. अशाप्रकारे भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर गांघीजींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वत:चे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली.
गांघीजींनीआपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. या काळात तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता. त्याच्या विरोधात तेथील भारतीयांना त्यांनी मदत केली. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधले गेले. त्यांनी १८९४ मध्ये नाताल भारतीय कॉंग्रेसची स्थापना केली व याद्वारे विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले. १८९७ मध्ये काही काळाच्या भारतातील वास्तव्यानंतर परत आल्यावर काही गोर्‍या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास नकार दिला. वैयक्तिक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्त्वांमध्ये नव्हते.
१९०६ मध्ये ट्रांसवाल सरकारने एक नवीन कायदा लागू केला. यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वत:ची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये, ११ सप्टेंबर ला, गांधीजींनी, पहिल्यांदाच सत्याग्रहाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांची सत्याग्रहाची कल्पना तेव्हा विकसित होत होती. त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करतांना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले. हे त्यांचे आवाहन मान्य करण्यात आले व सात वर्ष चाललेल्या अहिंसक चळवळीस सुरुवात झाली. यामध्ये तेथील भारतीयांनी नोंदणी करण्यास नकार दिला, नोंदणीपत्रे जाळून टाकली. त्यासाठी गांधीजींसह अनेकांना पोलिसांकडून मार, अत्याचार सहन करावा लागला व अनेकदा तुरूंगवास भोगावा लागला. सरकार हा विरोध मोडून काढण्यात शेवटी यशस्वी झाले तरी पण या अहिंसक चळवळीची नोंद घेऊन सरकारला गांधीजींसोबत वाटाघाटी कराव्या लागल्या.

 


१९१५ मध्ये गांधीजी भारतात परत आले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. पण खर्‍या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.

 

चंपारण आणि खेडा :

गांधीजीना पहिले यश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकर्‍यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकर्‍यांची गावे अत्यंत धाणेरडी आणि आरोग्य हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, परदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडा मध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व सखोल अभ्यास केला. गावकर्‍यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले.
पण त्यांचा मुख्य प्रभाव तेव्हा जाणवून आला जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरूंगाबाहेर, पोलिस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला ज्याद्वारे शेतकर्‍यांना जास्त मोबदला आणि स्वत:च्या मतानुसार पीक घेण्याची मोकळिक मिळाली. तसेच करवाढ रद्द झाली आणि दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकर्‍यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. याद्वारे कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली.

 

असहकार :

गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्वेग झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतरचे हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला. त्यांनी या दंग्यांना बळी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांबद्दल सहानुभुती दर्शविणारा आणि दंग्यांचा निषेध करणारा एक ठराव मांडला. या ठरावाला काँग्रेसमध्ये सुरुवातीला विरोध झाला. पण गांधीजींच्या तत्त्वांनुसार कोणत्याही प्रकारची हिंसा ही पाप होती आणि त्याचे समर्थन करता येणे शक्य नव्हते. हे तत्त्व मांडणार्‍या त्यांच्या भावनाप्रधान भाषणानंतर काँग्रेसने त्यांचा ठराव मान्य केला. पण या हत्याकांडाच्या आणि त्यानंतरच्या हिंसेच्या पश्चात गांधीजींनी आपले सर्व लक्ष पूर्ण स्वराज्यावर केंद्रित केले. त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेत पूर्ण वैयक्तिक, धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य समाविष्ट होते.
डिसेंबर १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण अधिकार गांधीजींना देण्यात आले. त्यांच्या नेत्रुत्वाखाली काँग्रेसची पुनर्बांधणी नवीन संविधानानुसार करण्यात आली. ज्याचा मुख्य उद्देश होता - स्वराज्य. पक्षाचे सभासदत्व थोड्याशा फीच्या मोबदल्यात सर्वांना खुले करण्यात आले. पक्षातील शिस्त वाढवण्यासाठी श्रेणीनुसार समित्या बनवल्या गेल्या. यामुळे फक्त उच्चभ्रुंसाठीच समजल्या जाणार्‍या पक्षाचे स्वरूप बदलले आणि काँग्रेस जनसामांन्याचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष बनला. गांधीजींनी अहिंसेच्या तत्त्वाला स्वदेशीची जोड दिली. त्यांनी सर्वांना परदेशी - विशेषत: ब्रिटिश - वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. या तत्त्वानुसार सर्व भारतीयांनी ब्रिटिश कपड्यांच्या ऎवजी खादीचा उपयोग करावा असे अभिप्रेत होते. प्रत्येक भारतीय पुरूष आणि स्त्रीने, प्रत्येक गरीब आणि श्रीमंत व्यक्तीने, दिवसाचा काही काळ भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनार्थ चरख्यावर सूत कातावे असा गांधीजींचा आग्रह होता.  याचा मुख्य उद्देश शिस्त आणि स्वावलंबनाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवणे तसेच स्त्रीयांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करूण घेणे हा होता. ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्कारासोबतच ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार, सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेल्या मान आणि पदव्यांचा त्याग करण्याचे आवाहन गांधीजींनी केले.
असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पण असहकार चळवळ जोमात असतांनाच असस्मात थांबवण्यात आली. याला कारण ठरले,उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण. ४ फेब्रुवारी १९२२ रोजी पोलिसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला व नंतर पोलिस ठाण्याला आग लावली. जमावावरील गोळीबारात ३ जण मरण पावले तर पोलिस ठाण्यात २३ पोलिस जळून मरण पावले. पुढे अजून जास्त हिंसक घटना घडतील या भीतीने गांधीजींनी चळवळ स्थगित केली.  १० मार्च १९२२ ला गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व सहा वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला. १९२४ मध्ये दोन वर्षांच्या तुरूंगवासानंतर अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली.
गांधीजी तुरूंगात असतांना त्यांच्या नेत्रुत्त्वाअभावी काँग्रेसमध्ये तूट पडू लागली. शेवटी काँग्रेसचे दोन गटात विभाजन झाले. एका गटाचे नेत्रुत्व चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्याकडे होते. हा गटाचा कल संसदीय कार्यकारणीत भाग घेण्याकडे होता. पण चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि सरदार पटेल यांच्या नेत्रुत्वाखालील दुसर्‍या गटाचा याला विरोध होता. हिंदू-मुस्लिमांमधला चळवळीदरम्यान वाढीस लागलेला एकोपापण ह्ळुह्ळू कमी होत होता. गांधी़जींनी हे मतभेद दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले. १९२४ मध्ये त्यांनी यासाठी तीन अठवड्यांचा उपवास केला. पण या प्रयत्नांना म्हणावे तितके यश मिळाले नाही.

 

स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह :

 

 

१९२०च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिले आणि त्यांनी आपले लक्ष स्वराज्य पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमधील मतभेद दूर करण्यावर केंद्रित केले. या काळात त्यांनी समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि गरिबी कमी करण्याचे आपले प्रयत्न चालू ठेवले. राजकारणाच्या पटावर ते १९२८ मध्ये परत आले. एक वर्ष आधी ब्रिटिश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये एकपण भारतीय सदस्य नव्हता. या कारणाने भारतीय पक्षांनी या समितीवर बहिष्कार टाकला. गांधीजींनी १९२८च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात एक ठराव पास केला ज्याद्वारे ब्रिटिश सरकारकडे भारताला सार्वभौम दर्जा देण्याची मागणी करण्यात आली व ही मागणी मंजूर न केल्यास परत पूर्ण स्वराज्यासाठी असहकार चळवळ सुरू करण्यात येईल असे धमकवण्यात आले. पक्षातील सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या तरूण नेत्यांची मागणी तात्काळ स्वराज्याची होती. पण गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी एका वर्षाचा अवधी दिला.[८] पण ब्रिटिश सरकारने काही उत्तर दिले नाही आणि ३१ डिसेंबर १९२९ मध्ये लाहोर अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवण्यात आला. हा दिवस काँग्रेसने स्वराज्य दिन म्हणून साजरा केला. पक्षातील प्रत्येक लहान थोराने हा दिवस साजरा केला. गांधीजींनी मग मार्च १९३० मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि त्याची परिणिती प्रसिद्ध दांडी यात्रेत झाली. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा, ६ एप्रिलला ४०० कि.मी.चा प्रवास करून दांडीला पोहोचली. हजारोंच्या संख्येने भारतीय या यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उखडण्याच्या प्रयत्नांमधील सर्वांत यशस्वी प्रयत्न ठरली. ब्रिटिशांनी उत्तरादाखल ६०,००० हून अधिक लोकांना तुरूंगात डांबले.

शेवटी लॉर्ड एडवर्ड आयर्विन यांच्या नेतृत्त्वाखालील ब्रिटिश सरकारने गांधीजींशी वाटाघाटी करण्याचे ठरवले. मार्च १९३१ मध्ये गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले आणि त्याबदल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करण्याची मागणी घातली.याबरोबरच गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होणार्‍या गोल मेज परिषदेचे आमंत्रण दिले. ही परिषद गांधीजी आणि पक्षासाठी निराशाजनकच ठरली, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऎवजी भारतातील राजे-रजवाडे आणि अल्पसंख्यक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता. यातच भर म्हणजे आयर्विननंतर आलेले लॉर्ड विलिंग्डन यांनी राष्ट्रवाद्यांची चळवळ नरम पाडण्याचे प्रयत्न चालू केले. गांधी़जींना अटक करण्यात आली. त्यांचा अनुयायांवरील प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना वेगळे करण्याचा हा डाव होता. पण त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
१९३२ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणीनुसार ब्रिटिश सरकारने दलितांना वेगळे मतदारसंघ देण्याचा निर्णय घेतला. याविरोधात गांधीजींनी सहा दिवसांचे उपोषण केले. यामुळे ब्रिटिश सरकारला अजून जास्त समानतेवर आधारित मतदारसंघ विभागणी करणे भाग पडले. या वाटाघाटी दलित समाजातील (भूतपूर्व क्रिकेट खेळाडू) पालवणकर बलू यांच्या मध्यस्थीने पार पडल्या. येथून पुढे गांधीजींनी दलितांच्या उद्धारासाठी काम करणे चालू केले. ते दलितांना हरिजन (देवाची माणसे) म्हणत. ८ मे १९३३ ला गांधीजींनी दलित चळवळीसाठी २१ दिवसाच्या उपोषणाची सुरुवात केली. त्यांचे हे प्रयत्न तितके यशस्वी ठरले नाहीत. दलित समाजामधून पण त्यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. आंबेडकरांनी दलितांना हरिजन म्हणण्याचा निषेध केला. त्यांच्या मते दलितांना हरिजन म्हणणे म्हणजे त्यांना सामाजिकदृष्ट्या अपरिपक्व म्हणण्यासारखे आहे आणि ते संबोधन, उच्च जातींनी दलितांच्या पालकाची भूमिका निभावली आहे, असे प्रतित करते. गांधीजी हे दलितांचे राजनैतिक हक्क हिरावून घेत आहेत असेपण आंबेडकर आणि त्यांच्या काही सहकार्‍यांना वाटत असे. आंबेडकरांसारखे दलित समाजातील नेते असतांनासुद्धा आणि स्वत: वैश्य असूनसुद्धा, आपण दलितांची बाजू मांडू शकतो असा गांधीजींना विश्वास होता.
१९३४ च्या उन्हाळ्यात गांधीजींवर तीन अयशस्वी प्राणघातकी हल्ले झाले.
जेव्हा कॉंग्रेसने निवडणूक लढवण्याचा आणि फेडरेशन आराखड्याअंतर्गत सत्ता हातात घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा गांधीजींनी आपल्या पक्ष-सभासदत्त्वाचा राजीनामा दिला. गाधींजी पक्षाच्या या निर्यणाबद्दल असहमत नव्हते. पण त्यांना असे वाटले की, जर त्यांनी राजीनामा दिला तर, त्यांची भारतीयांमधील प्रसिद्धी, पक्षाच्या इतर साम्यवादी, समाजवादी, कामगार प्रतिनिधी, विद्यार्थी, धार्मिक रूढीतत्त्ववादी आणि व्यापारी वर्गातील प्रतिनिधींना आपले विचार जनतेसमोर मांडू देण्याच्या आड येणार नाही. तसेच गांधीजी राज (ब्रिटिश) सरकारमध्ये सहभाग स्विकारलेल्या पक्षाचे (कॉंग्रेसचे) नेत्रुत्व करून इंग्रजांना त्यांच्याविरूद्ध बोलण्याची अजून एक संधी देऊ इच्छित नव्हते.
गांधीजी १९३६ मध्ये पक्षात परत आले. तेव्हा जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे लखनौ अधिवेशन चालू होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या भविष्याबद्दल विचार करण्यापेक्षा आधी पूर्ण स्वराज्य कसे मिळेल यावर सर्व लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे गांधीजींचे मत होते. पण तरीही पक्षाच्या समाजवादी धोरणाचा अवलंब करण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही. १९३८ साली पक्षाध्यक्षपदी निवडून आलेले सुभाषचंद्र बोस आणि गांधीजीं यांच्यात अनेक वाद झाले. गांधीजींच्या या विरोधाची मूळ कारणे सुभाषचंद्रांचा अहिंसेवरील अविश्वास ही होती. गांधीजींचा विरोध असूनसुद्धा बोस सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपदी निवडून आले. पण जेव्हा सुभाषचंद्रांनी गांधीजींच्या तत्त्वांना सोडून दिले आहे या कारणाने देशभरात अनेक पक्षनेत्यांनी सामुदायिक राजिनामे दिले, तेव्हा बोसांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

 

दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन :

 

 

१९३९ मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसर्‍या महायुद्धाला सुरुवात झाली. सुरुवातीला गांधीजी ब्रिटिशांना 'अहिंसक नैतिक पाठिंबा' देण्याच्या मताचे होते. पण पक्षातील इतर नेते, भारतीय लोकप्रतिनिधींचे मत घेतल्याशिवाय भारताला एकतर्फीपणे युद्धात ओढल्यामुळे नाखुश होते. सर्व काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळातून सामुदायिक राजीनामे देण्याचे ठरवले. दीर्घ विचारविनिमयानंतर गांधीजींनी जाहीर केले की, भारत या युद्धाचा एक भाग बनणार नाही, जे युद्ध वरवर तर लोकशाहीवादी स्वातंत्र्यासाठी म्हणून लढवले जात होते आणि दुसरीकडे तेच स्वातंत्र्य भारताला नाकारण्यात येत होते. जसेजसे युद्ध पुढे सरकत गेले तसेतसे गांधीजी स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत गेले. त्यांनी एक ठराव मांडला ज्याद्वारे इंग्रजांना 'भारत सोडून जा' (भारत छोडो) असे ठणकावण्यात आले. हा गांधीजी आणि पक्षाचा ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचा सर्वांत स्पष्ट व अंतिम प्रयत्न होता.
पक्षातील आणि इतरही काही नेत्यांनी गांधीजींवर टिका केली. यात ब्रिटिशांचे समर्थन करणारे तसेच त्यांना विरोध करणारे दोन्ही गट सामिल होते. काहींना वाटले की इंग्रजांच्या जीवनमरणाच्या अशा या युद्धात त्यांना विरोध करणे अनैतिक होय तर काहींचे मत होते की गांधीजी मिळालेल्या संधीचा पूर्ण उपयोग करून घेत नाही आहेत. भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वांत प्रभावी चळवळ ठरली. यात लाखांच्या संख्येने लोकांना अटका झाल्या, अभूतपूर्व अत्याचार करण्यात आला. हजारो आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले.गांधीजी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे स्पष्ट केले की भारताला तात्काळ स्वातंत्र्य दिल्याशिवाय भारत महायुद्धात मदत करणार नाही. गांधीजींनी हेसुद्धा स्पष्ट केले की यावेळेस एखाद-दुसर्‍या हिंसक घटनेमुळे ही चळवळ मागे घेण्यात येणार नाही. आवरात ठेवलेल्या अराजकतेपेक्षा खरी अराजकता बरी. असे सुचवून त्यांनी काँग्रेस सदस्यांना अहिंसेचे पालन करण्याचे आवाहन केले आणि भारतीयांना 'करो या मरो' (करा किंवा मरा) हा मूलमंत्र दिला.
गांधीजी आणि काँग्रेसची पूर्ण कार्यकारणी समिती यांना इंग्रजांनी ९ ऑगस्ट १९४२ ला मुंबईमध्ये अटक केली. गांधीजींना दोन वर्षासाठी पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये बंदिवासात ठेवण्यात आले. तेथील वास्तव्यात गांधीजींना वैयक्तिक आयुष्यात दोन धक्के सहन करावे लागले. सहा दिवसांनंतरच त्याचे खाजगी सचिव महादेव देसाई वयाच्या ५०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा १८ महिन्यांच्या बंदिवासानंतर २२ फेब्रुवारी १९४४ ला मरण पावल्या. ६ अठवड्यांनंतरच गांधीजींना तीव्र मलेरिया झाला. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे आणि ऑपरेशनच्या आवश्यकतेमुळे त्यांना युद्ध संपण्याआधीच ६ मे १९४४ ला सोडण्यात आले. ते बंदिवासात मरण पावले तर संपूर्ण देश संतप्त होईल अशी भीती ब्रिटिश सरकारला वाटत होती. जरी भारत छोडो आंदोलनाला माफक यश मिळाले तरी करड्या जरबेने व कडक उपाययोजनांनी इंग्रजांनी १९४३च्या अंतापर्यंत भारतातील आपले राज्य सुरळीत ठेवले होते. युद्धाच्या शेवटी इंग्रजांनी भारतीयांच्या हाती सत्ता देण्याचे स्पष्ट संकेत दिले. तेव्हा गांधीजींनी आंदोलन संपवले आणि जवळपास एक लाख राजनैतिक कैद्यांची सुटका करण्यात आली ज्यामध्ये काँग्रेस नेत्यांचापण समावेश होता.

 

स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी :

१९४६ मधील ब्रिटिश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नामंजूर करण्याची सूचना गांधीजींनी काँग्रेसला दिली. या शिफारशींमधील मुस्लिम बहुसंख्य राज्यांच्या एकत्रीकरणाबद्दल गांधीजी साशंक होते. त्यांच्या मते ही फाळणीची नांदी होती. पण जरी पक्ष गांधीजींचा सल्ला खचितच मानत नसे, तरी यावेळी मात्र त्यांनी हा सल्ला मानला नाही. कारण पंडित नेहरू आणि पटेलांना माहित होते की जर ब्रिटिशांच्या शिफारशी मान्य नाही केल्या तर राज्य कारभाराचे नियंत्रण मुस्लिम लीग कडे जाईल. १९४६ आणि १९४८ च्या दरम्यान ५,००० हून जास्त व्यक्ती दंगलींमध्ये मारले गेले. गांधीजींनी अशा प्रत्येक योजनेचा जोरदार विरोध केला जी भारताची फाळणी दोन राष्ट्रांत करेल. भारतातील बहुसंख्य मुस्लिम, जे हिंदू आणि शिखांच्या सोबत राहत होते, ते फाळणीला अनुकुल होते. अजून म्हणजे, मुस्लिम लीगचे नेते, मोहम्मद अली जीना यांना, पश्चिम पंजाब, सिंध, उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत आणि पूर्व बंगालमध्ये बराच पाठिंबा होता. हिंदू-मुस्लिमांमधील अंतर्गत युद्ध टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणून काँग्रेसने फाळणीच्या आराखड्याला मान्यता दिली. काँग्रेस नेत्यांना माहित होते की गांधीजी फाळणीला तीव्र विरोध करतील आणि गांधीजींच्या पक्षातील आणि देशातील पाठिंब्यामुळे त्यांच्या अनुमतीशिवाय पुढे जाता येणार नाही. गांधीजींच्या निकटच्या सहकार्‍यांनी फाळणीचा (त्या परिस्थितीतील) सर्वोत्तम पर्याय म्हणून स्विकार केला होता. सरदार पटेलांनी गांधीजींना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, फाळणी हा अंतर्गत युद्ध टाळण्यासाठी एकमेव पर्याय आहे. शेवटी उद्ध्वस्त गांधीजींनी आपली अनुमती दिली.
त्यांनी उत्तर भारतातील तसेच बंगालमधील प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातील नेत्यांसोबत दीर्घ चर्चा केल्या. १९४७च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरदेखील, भारत सरकारचा फाळणी करारानुसार ठरलेले ५५ कोटी रूपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय त्यांना आवडला नाही. सरदार पटेलांसारख्या नेत्यांना वाटत होते की, या पैशांचा उपयोग पाकिस्तान युद्धासाठी भांडवल पुरवण्यासाठीच करेल. सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यावे या मागणीने परत जोर पकडला होता. तसेच हिंदू आणि मुस्लिम नेते एकमेकांना समजून घेण्यात असमर्थता दाखवित होते. या सर्व कारणांनी गांधीजी अत्यंत व्यथित झाले होते. त्यांनी या दंगली बंद करण्याच्या आणि पाकिस्तानला ५५ कोटी देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण चालू केले. गांधीजींना भिती वाटत होती की, पाकिस्तानमधील अस्थिरता आणि असुरक्षितता त्यांचा भारताबद्दलचा राग वाढवेल आणि या दंगली देशाच्या सीमा ओलांडून जातील, तसेच हिंदू आणि मुस्लिमांमधील शत्रुत्व परत डोके वर काढील आणि त्याची परिणिती अंतर्गत बंडात होईल. त्यांच्या आयुष्यभराच्या सहकार्‍यासोबतच्या अनेक वादविवादांनंतरही गांधीजी आपल्या निर्णयावरून मागे हटले नाहीत आणि शेवटी सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रूपये दिले. हिंदू, मुस्लिम आणि शिख नेत्यांनी, ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या नेत्यांचा समावेश होता, हा हिंसाचार थांबवण्याचे आणि लोकांकडे शांततेची मागणी करण्याचे वचन दिले. यानंतर गांधीजींनी सत्र्याचा रस पिऊन आपले उपोषण सोडले.

मृत्यू : 

 

३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते. घोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राज घाट येथील समाधीवर ’हे राम’ असे लिहिले आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात, पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून देशाला संबोधित केले:
"माझ्या मित्र आणि सहकार्‍यांनो, आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे आणि मला कळत नाही आहे तुम्हाला काय आणि कसे सांगावे. आपले आवडते नेते-राष्ट्रपिता, ज्यांना आपण प्रेमाने ’बापू’ म्हणत असू, आता आपल्यामध्ये नाही आहेत. कदाचित तसे म्हणणे चूकच ठरेल, पण आपण त्यांना आता बघू शकणार नाहीत, जसे आपण त्यांना इतके वर्ष बघत आलो आहोत. (संकटांमध्ये) त्यांचा सल्ला घ्यायला आपण आता धावत जाऊ शकणार नाही. त्यांच्या सानिध्यातील शांती आणि समाधान आपल्याला मिळणार नाही. हा एक प्रचंड धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर या देशातील कोट्यावधी लोकांसाठीसुद्धा."
गांधीजींच्या अस्थी रक्षापात्रांमध्ये भरून देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठविण्यात आल्या. जवळपास सर्व अस्थींचे विसर्जन १२ फेब्रुवारी १९४८ ला अलाहाबाद येथील संगमावर करण्यात आले. पण काही अस्थी लपवण्यात आल्या होत्या. १९९७ मध्ये तुषार गांधी यांनी एका रक्षापात्राचे विसर्जन केले. हे रक्षापात्र एका बॅंकेमधील लॉकरमध्ये सापडले होते आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते. ३० जानेवारीला त्यांच्या परिवाराने अजून एका रक्षापात्राचे विसर्जन मुंबईत गिरगाव चौपाटीवर केले. हे पात्र एका दुबई-स्थित व्यापार्‍याने मुंबईमधील एका वस्तुसंग्रहालयाला पाठविले होते. अजून एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे (जिथे गांधीजी १९४२ आणि १९४४ च्या दरम्यान बंदिवासात होते) आणि दुसरे एक पात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिअलायझेशन लेक श्राइन येथे आहे. त्यांच्या परिवाराला जाणीव आहे की तेथील अस्थी राजकीय फायद्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. पण ते पात्र तिथून काढून घेणे त्या मठाला बंद पडण्यास भाग पाडेल या कारणाने गांधीजींचे वंशज त्यांच्या अस्थी तिथून काढून घेऊ इच्छित नाही आहेत.

 

गांधीजींची तत्त्वे :

 

सत्य :

गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रसिद्ध आहे. गांधीजींनी म्हटले आहे की, सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. "परमेश्वर सत्य आहे." असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी ते, "सत्य (हेच) परमेश्वर आहे." असे बदलले.

 

अहिंसा :

जरी अहिंसेचे तत्त्व गांधीजींनी स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते प्रथमच व्यक्ती होते. हिंदू, बौद्ध, जैन, ज्यू धर्मात अनेक ठिकाणी अहिंसेच्या तत्त्वाचा उल्लेख आहे. "माझे सत्याचे प्रयोग" मध्ये गांधीजींनी त्यांचे अहिंसेचे तत्वज्ञान मांडले आहे. ते म्हणतात,
"जेव्हा मी निराश होतो,तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. (इतिहासात) अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे-विचार करा, नेहमीच."
"विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली-(त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?"
"डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला अंधळे करून सोडेल."
"अशी अनेक ध्येयं आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन."
पण गांधीजींना माहित होते की, अहिंसेचे या पातळीपर्यंत पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक आहे आणि प्रत्येकाजवळच ते असणे शक्य नाही. त्यामुळे ते सल्ला देत की प्रत्येकाने अहिंसेचे पालन करणे आवश्यक नाही, विशेषतः जर अहिंसा भित्रेपणाला झाकण्यासाठी वापरण्यात येत असेल तर.



शाकाहार :

लहानपणी अनेकदा गांधीजींनी मांस भक्षण केले होते. ते मुख्यत्वेकरून त्यांच्या कुतुहलामुळे तसेच त्यांचा मित्र शेख मेहताब याच्या सांगण्यावरून होते. शाकाहाराची कल्पना हिंदू तसेच जैन प्रथांमध्ये खोलवर रुजली आहे. तसेच गांधीजींची जन्मभूमी गुजरातमध्ये बहुतांश हिंदू आणि सर्व जैन शाकाहारी होते आणि गांधीजींचे कुटुंबही याला अपवाद नव्हते. लंडनला शिकायला जाण्याआधी गांधीजींनी त्यांची आई पुतळीबाई आणि काका बेचारजी स्वामी यांना वचन दिले होते की ते मांस, बाई व बाटली (दारू) यांच्यापासून दूर राहतील. पुढे गांधीजी कडक शाकाहारी बनले. त्यांनी "मोराल बेसिस ऑफ व्हेजिटेरिअनिझम" (Moral Basis of Vegetarianism) हे पुस्तक लिहिले आहे तसेच शाकाहारावर अनेक लेखसुद्धा लिहिले आहेत. त्यातील काही लेख लंडन व्हेजिटेरिअन सोसायटीच्या "द व्हेजिटेरिअन" या प्रकाशनातून प्रसिद्ध झाले आहेत.

वाक्यप्रचाराचा अर्थ


चौदावे रत्न दाखविणे - शिक्षा करणे
पानिपत झाले - सर्वनाश झाला
तोंड दाबणे - लाच देणे 
बुडती येणे - नुकसान होणे
पाण्यावरची रेघ - क्षणभंगुर बाब 
अर्धचंद्र देणे - काढून टाकणे
समरस होणे - एकरूप होणे 
लंकेची पार्वती - अंगावर दागिने नसलेली स्त्री 
कपिलाषष्ठीचा योग - दुर्मिळ योग 
रात्र नसणे - सतत कार्यरत असणे

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

सुविचार


  • माणूस काय होता यापेक्षा आज तो काय आहे याविषयी जागरुक आणि तत्पर असा .
  • जो काही आवश्यक असेल त्यावर लक्ष केंद्रीत करूनच कार्य करा म्हणजे मनाचा विनीयोग सुज्ञपणे केला जाईल.
  • भूतकाळापासून शिका वर्तमानाचा आनंद लूटा आणि भविष्याकरीता योजना आखा.
  • सत्ता लोण्यासारखी झुरत जाते तेव्हा अधिकाऱ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते.
  • सर्वकाही उत्त्मच घडेल अशी अपेक्षा बाळगा आणि वाईट घडलेच तर त्याचाही स्विकार करा.
  • घमेंड हा पदार्थ दारू आणि अफू पेक्षाही भयंकर अंमली असतो.
  • जेथे शांती वास करते तेथे दोन माणसे एकमेकांचा द्वेश करु शकत नाही .
  • यश प्राप्त झाले की श्रेय घेण्यास अनेकजण पुढे येतात. मात्र अपयशाला वारस नसतो.
  • जे तुमच्यापाशी आहे त्याविषयी कृतज्ञ असा. पण जे तुमच्यासाठी नाही त्याचे दु:ख मानु नका .
  • जे ब्रम्ह दिसत नाही ते सत्य आहे.आणि जे जग दिसत आहे.  ते नाशिवंत आहे . 
  • उद्याचे भय नको. सर्वव्यापी परमेश्वर तेथे आधीच उभा आहे.
  • अहंकार म्हणजेच परमेश्वराला आपल्या जीवनातून दूर लोटतो.
  • स्वत:च्या अधिकारात वाढ, कर्तुत्वमान माणसाला मागावी लागत नाही कधी. 
  • भूतकाळापासून शिका वर्तमानाचा आनंद लूटा आणि भविष्याकरीता योजना आखा.
  • आपण जीवन जगतो पण त्यातुन बोध घेण्यास मात्र असमर्थ ठरतो. हेच खरे जीवनातील अपयश होय .
  • मृत्यू हा जग, व्याध्री म्हणजेच म्हातारपण व आजारपण संपविणारा स्वल्पविराम आहे.