- माणूस काय होता यापेक्षा आज तो काय आहे याविषयी जागरुक आणि तत्पर असा .
- जो काही आवश्यक असेल त्यावर लक्ष केंद्रीत करूनच कार्य करा म्हणजे मनाचा विनीयोग सुज्ञपणे केला जाईल.
- भूतकाळापासून शिका वर्तमानाचा आनंद लूटा आणि भविष्याकरीता योजना आखा.
- सत्ता लोण्यासारखी झुरत जाते तेव्हा अधिकाऱ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते.
- सर्वकाही उत्त्मच घडेल अशी अपेक्षा बाळगा आणि वाईट घडलेच तर त्याचाही स्विकार करा.
- घमेंड हा पदार्थ दारू आणि अफू पेक्षाही भयंकर अंमली असतो.
- जेथे शांती वास करते तेथे दोन माणसे एकमेकांचा द्वेश करु शकत नाही .
- यश प्राप्त झाले की श्रेय घेण्यास अनेकजण पुढे येतात. मात्र अपयशाला वारस नसतो.
- जे तुमच्यापाशी आहे त्याविषयी कृतज्ञ असा. पण जे तुमच्यासाठी नाही त्याचे दु:ख मानु नका .
- जे ब्रम्ह दिसत नाही ते सत्य आहे.आणि जे जग दिसत आहे. ते नाशिवंत आहे .
- उद्याचे भय नको. सर्वव्यापी परमेश्वर तेथे आधीच उभा आहे.
- अहंकार म्हणजेच परमेश्वराला आपल्या जीवनातून दूर लोटतो.
- स्वत:च्या अधिकारात वाढ, कर्तुत्वमान माणसाला मागावी लागत नाही कधी.
- भूतकाळापासून शिका वर्तमानाचा आनंद लूटा आणि भविष्याकरीता योजना आखा.
- आपण जीवन जगतो पण त्यातुन बोध घेण्यास मात्र असमर्थ ठरतो. हेच खरे जीवनातील अपयश होय .
- मृत्यू हा जग, व्याध्री म्हणजेच म्हातारपण व आजारपण संपविणारा स्वल्पविराम आहे.
शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२
सुविचार
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)