विकिलीक्स ही जगभरातील गोपनीय तसेच गुप्त बातम्या प्रसिद्ध करणारी एक वादग्रस्त विना-नफा संस्था आहे. डिसेंवर २००६ मध्ये स्थापन झालेल्या विकीलीक्सने आपल्या संकेतस्थळाच्या द्वारे आजवर लाखो गुप्त व संवेदनशील सरकारी कागदपत्रे, अहवाल व मेमो प्रकाशित केले आहेत. जुलियन असांज हा विकीलीक्सचा प्रमुख संपादक व प्रवक्ता आहे.
विकीलीक्सचा विकिपीडिया किंवा विकिमीडिया फाउंडेशनशी काहीही संबंध नाही.
स्थापना
विकिलीक्स ची स्थापना अंसाज यांनी 4 ऑक्टोबर 2006 रोजी केली. प्रथम "विकी" (कोणी पण संपादित करू शकेल अशी) वेबसाइट 2010 पासून वेगळी करण्यात आली. आधी कोणी पण विकिलीक्स संपादित करू शकत होते, सध्या 2010 नंतर ही प्रणाली बदलण्यात आली आहे. अमेरिकेचे गुप्त कागदपत्रे प्रससिद्ध करणे - या कार्य मुळे ही संगठणा कमी वेळेत जास्त प्रभावी ठरली. अमेरिकेची इराक मधील अमानुष कारवाईचे चित्रफिती या संगठनेने इंटरनेट वर प्रसारित केल्या , त्यामुळे संगठनेस लोकांचा पाठिंबा मिळत राहिला.
जुलियन असांज (इंग्लिश: Julian Assange; जन्मः ३ जुलै १९७१) हा एक ऑस्ट्रेलियन पत्रकार, संपादक व चळवळवादी आहे. असांज हा विकीलीक्स ह्या गुप्त कागदपत्रेइंटरनेटवर प्रकाशित करणार्या संकेतस्थळाचा मुख्य संपादक व प्रवक्ता आहे. आजवर असांजच्या नेतृत्वाखाली विकीलीक्सने लाखो गुप्त सरकारी अहवाल, मेमो व संवेदनशील कागदपत्रे खुली केली आहेत. ह्यांमध्ये अमेरिकेच्या इराक व अफगाणिस्तानमधील युद्धांबाबत अनेक दस्तावेजांचा समावेश आहे. २८ नोव्हेंबर २०१० रोजी विकीलीक्सने अमेरिकेच्या परराष्ट्रीय खात्याने व जगभरातील अमेरिकन राजदूतांनी लिहिलेली अत्यंत गुप्त अहवाल प्रकाशित करण्यास सुरुवात केली. ह्यामुळे असांजने अमेरिकेसोबत जगभरातील अनेक देशांचा रोष ओढवून घेतला आहे.
आयुष्य
असांज यांचा जन्म क्वीन्सलँड मध्ये झाला. त्यांच्या सावत्र वडिलांच्या म्हणन्यानुसार ते लहानपणा पासूनच हुशार होते, व त्यांना "काय बरोबर आहे व काय चूक आहे" याची जाणीव फार लहान वयात आली होती.
आजवर असांज अनेक देशांमध्ये राहिला आहे. ऑगस्ट २०१० मध्ये स्वीडनने असांजवर एका महिलेचा बलात्कार केल्याबद्दल खटला भरला व असांजला फरारी घोषित केले व असांजला स्वीडनमध्ये परतण्याचा आदेश दिला. ३० नोव्हेंबर २०१० रोजी इंटरपोल ह्या आंतरराष्ट्रीय पोलिस संस्थेने असांजवर अटक वॉरंट लागू केला व ७ डिसेंबर २०१० रोजी त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आले. आपल्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावला गेला आहे अशी असांजची भुमिका आहे.
रसग्रहण : व्हच्र्युअल ते रिअॅलिटी! 

सुचिता देशपांडे , रविवार , ३ जून २०१२
स्वत:च्या ताकदीवर बिनचूक माहिती उघड करण्याचे आव्हान पेलत बलाढय़ महासत्तांना हादरे देणारा जुलियन असांज याचे ‘विकिलीक्स’ हे मूळ आत्मकथन जेव्हा प्रकाशित झाले, तेव्हा त्यातल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे आणि व्यक्त केलेल्या ठाम मतांमुळे या पुस्तकाद्वारे आपल्या आयुष्याबद्दल आणि विकिलीक्सच्या कामाबद्दल सांगत स्वतची बाजू मांडली आहे. या त्याच्या आत्मकथनाचा ज्येष्ठ पत्रकार सुहास फडके यांनी केलेला मराठी अनुवाद अलीकडेच अमेय प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला आहे.
एखाद्या घटनेची योग्य-अयोग्यता, तिची नैतिक, कायदेशीर बाजू याकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यक्तिसापेक्ष असतो. हे पुस्तक वाचताना अनेकदा हे द्विधा प्रश्न उभे राहतात. सत्ताधाऱ्यांचे महत्त्वाचे निर्णय गोपनीय असावेत, यावर त्या विशिष्ट व्यवस्थेचा भर असतो. अशा वेळेस तंत्रज्ञान क्रांतीच्या साहाय्याने कॉम्प्युटर सिस्टीममध्ये घुसखोरी करत त्या निर्णयांमागचा सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा उघड करणाऱ्या जुलियन असांजला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं का? आणि या सिस्टीममध्ये घुसूनही कुठलाही आर्थिक घोटाळा न केल्याचा दावा असांजने केला, तरी एखाद्या व्यक्तीने बडय़ा कंपन्याच्या, देशोदेशींच्या संरक्षण मंत्रालयांच्या कॉप्युटर सिस्टीममध्ये मुशाफिरी करून गोपनीय मजकूर मिळवणे कितपत योग्य ठरते? अशा वेळेस एखाद्या कृत्याचा अंतिम परिणाम आणि त्याची व्याप्ती मोलाची की, या सगळ्याची उकल करण्याचा मार्गही महत्त्वाचा, हा प्रश्न घोंघावत राहतो.
टीनएज वयात गंमत म्हणून जुलियनने हॅकिंग सुरू केले आणि जग बदलायचेय, या निष्कर्षांप्रत तो पोहोचला. कोणत्यातरी विशिष्ट संस्थेसाठी, संघटनेसाठी नव्हे, तर सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी यंत्रणा असायला हवी, असे त्याला वाटू लागले. मेलबर्न आणि नंतर न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ क्वान्टम मेकॅनिक्सचा अभ्यास करताना सत्याचा शोध आणि न्यायाची शक्यता हे नाते किती गुंतागुंतीचे असत, याचा अदमास तो घेऊ लागला. चळवळी आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्र येण्यातून सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणता येण्याचे मनसुबे तो तयार करू लागला.
कॉम्प्युटर तंत्रज्ञानाने जगभरच्या सर्व देशांना समान पातळीवर आणले. जगाच्या कानाकोपऱ्यांतील देश यामुळे मुख्य प्रवाहाशी जोडले गेले. १६व्या वर्षी कॉम्प्युटर विश्वात डोकावल्यानंतर जुलियन असांज त्यात अवघा बुडून गेला. बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि कॉम्प्युटरमधील रुची असलेल्या या टीनएजरने केवळ गंमत आणि चुरस म्हणून अल्पावधीतच कोड ब्रेक करणे, सांकेतिक भाषा उलगडणे, प्रोग्राम लिहिणे सुरू केले.
जुलियनच्या मते, कॉम्प्युटर क्रांतीमुळे होणारी नवनिर्मिती आणि कॉम्प्युटर सिस्टीम उभारणाऱ्यांची विचारप्रक्रिया समजून घेणे हा त्याचा हॅकिंग करण्यामागील उद्देश होता. नंतर मात्र त्याला याद्वारे स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सत्ताधारी काय करतात, हे समजून घेण्याची संधी मिळाली आणि मग गोपनीय माहिती मिळवून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा तडाखा त्याने सुरू केला. हे करताना कृष्णकृत्याचे सत्य बाहेर पडू नये, म्हणून गुप्ततेचा आश्रय घेणाऱ्या सरकार, संस्था यांच्याविरुद्ध आम्ही लढत आहोत, अशी भूमिका त्याने घेतली. मात्र हॅकिंगकरवी रक्कम वळती करणे, व्यापारी रहस्य विकणे, असले निंदनीय कृत्य त्याने कधी केले नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.
त्याने इराक आणि अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेने किती क्रौर्य दाखवले, हे जगापुढे आणले. केनिया, आफ्रिका, इजिप्त, मलेशिया, इराण या देशांमधील अराजकता, कोसळू लागलेली आइसलँडची अर्थव्यवस्था या सगळ्याच्या मुळापर्यंत तो पोहोचला. विकिलीक्स ही संघटना ‘विचार जगाचा, कृती जागतिक’ करणारी ठरू शकते का, याचा सर्वतोपरी आणि स्वत:च्या ताकदीवर पाठपुरावा केला. त्याच्यावर धाड पडली, त्यानंतर असांजविरुद्ध आरोपपत्र दाखल होणे आणि खटला सुरू होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागला. त्या दरम्यान सिस्टीम्सची सुरक्षितता तपासण्यासाठी हॅक करण्याचे कंपन्यांनी सोपवलेली कामगिरी त्याने पूर्ण केली, अल्पवयीन लैंगिक शोषण करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणाऱ्या टोळीचा माग काढण्यात त्याने पोलिसांना मदत केली.
खटला चालू असताना त्याची झालेली विमनस्क अवस्थाही या पुस्तकाद्वारे समजून घेण्यास मदत होते. माणसे जोडण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात असताना कोणाशीही संवाद साधता न येणं, हा भयंकर अनुभव काय असतो, याचे चित्रण यात आहे.
या पुस्तकातील त्याच्या बालपणाविषयीच्या प्रकरणातून स्वभावातील बंडखोरी, लढाऊ वृत्ती, या सगळ्याचे बाळकडू त्याला त्याच्या आईकडून मिळाल्याचे स्पष्ट होते. त्याचे सावत्र बाबा ब्रेट हे नाटय़कर्मी होते. सारा रंगमंच उभारणे आणि प्रयोग संपल्यावर कमीत कमी वेळात गुंडाळणे ही त्यांच्याकडून शिकलेली गोष्ट जुलियनच्या भविष्यातील विकिलीक्सच्या तयारीत महत्त्वाची ठरली, हेही वाचकाला जाणवते.
हे नवे तंत्रज्ञान निव्वळ बडय़ा उद्योगांच्या आणि सत्ताधाऱ्यांचे लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे हत्यार बनणार नाही, याची काळजी हॅकर्सनी घेतली, असे त्याने पुस्तकात नमूद केले आहे. यातून कॉम्प्युटर तंत्रज्ञान हे सामाजिक बदलातील एक प्रमुख हत्यार असू शकते, यावर असलेला त्याचा विश्वास दिसून येतो आणि यातच विकिलीक्सच्या जडणघडणीचे मूळ दडलेले आहे.
कट रचणाऱ्या शक्तींना वेळीच रोखून त्यांना लोकांसमोर उघडे करणे हा विकिलीक्सचा प्रमुख अजेंडा राहिला. विकिलीक्सने बाहेर काढलेल्या मोठमोठय़ा प्रकरणांमध्ये बडय़ा वृत्तपत्र समूहांच्या बदलत्या भूमिका, दोषारोप असलेल्या व्यवस्थेला प्रतिप्रश्न न करण्याचा वृत्तपत्रांनी दाखवलेला पळपुटेपणा याबद्दलही या पुस्तकात ओघाने लिहिले आहे.
जुलियन असांजला ज्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले होते, त्या नॉरफोक येथे ध्वनिमुद्रित मुलाखतींद्वारे हे पुस्तक लिहिले गेले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचताना हेही प्रकर्षांने जाणवतं की, हा निव्वळ अनुवाद नव्हे, त्यामागे घटनाक्रम, जागतिक राजकारण आणि हे सारे सोप्या पद्धतीने वाचकापर्यंत पोहोचविण्याची हातोटीही गरजेची आहे. या सर्व गोष्टी साधल्या गेल्याने सुहास फडके यांनी केलेला हा अनुवाद आणि त्यामुळे ते पुस्तक प्रवाही बनले आहे.
एकूणच, जुलियन असांजचे हे आत्मकथन असले तरी वाचकाचे मन केवळ त्याच्यावर एकवटत नाही, तर संगणक क्रांती, बलाढय़ देशांचा अप्पलपोटेपणा, व्यवस्थेचा पर्दाफाश करणाऱ्याला चिरडण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे जंगजंग पछाडणे या कल्पनेपलीकडच्या कठोर वास्तवापाशी भिरभिरते. आणि म्हणूनच कदाचित बलाढय़ व्यवस्थेशी टक्कर देणारा सर्वसामान्यांचा एक प्रतिनिधी म्हणून वाचकांची सहानुभूती मिळविण्यात तो यशस्वी ठरतो.
विकिलीक्स - जुलियन असांज, अनुवाद - सुहास फडके, अमेय प्रकाशन, पृष्ठे २१२, मूल्य रु. २२५

[संपादन]विकीलिक्स
असांज यांनी 4 ऑक्टोबर 2006 रोजी विकिलीक्स ची स्थापना केली. विकिलीक्स ही आंतराष्ट्रीय "ना नफा ना तोटा" तत्वावर चालणारी प्रभावी संगठणा आहे. अमेरिकेचे गुप्त कागदपत्रे प्रससिद्ध करणे - या कार्य मुळे ही संगठणा कमी वेळेत जास्त प्रभावी ठरली. अमेरिकेची इराक मधील अमानुष कारवाईचे चित्रफिती या संगठनेने इंटरनेट वर प्रसारित केल्या , त्यामुळे संगठनेस लोकांचा पाठिंबा मिळत राहिला. सरकारी "गुप्त" कागदपत्रे प्रसारित केल्यामुळे असांज हे नेहमीच वेगळ्या वेगळ्या सरकारी यंत्रणेच्या नजरेत असतात.रिकेसोबत जगभरातील अनेक देशांचा रोष ओढवून घेतला आहे.
विकिलीक्स आणि भारत
जगभरात कुठेही कार्यालय नसलेल्या, पण जगभरातील अनेक पत्रकार, गणितज्ज्ञ व तंत्रज्ञ यांचा सहभाग असलेल्या आणि "We open governments' हे घोषवाक्य असलेल्या विकिलीक्सने 2007 पासून अमेरिका आणि पाश्चात जगातील काही कागदपत्रे प्रसिद्ध करुन खळबळ माजवली. मात्र, गेल्या वर्षभरात ‘द गार्डियन’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द स्पीगेल’, ‘ल मॉंद’ या वृत्तपत्रांनी विकिलीक्सची कागदपत्रे प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे.
भारतातील वृत्तपत्रीय नीतीमूल्ये पाळणारा, विश्वासार्हता जपणारा, समाजमनावर प्रभाव असणारा, राज्यकर्त्यांवर दबाव टाकणारा आणि तरीही व्यावसायिक दृष्टीने प्रचंड यशस्वी झालेल्या ‘द हिंदू’ या दैनिकाने भारतासंबंधी विकिलीक्सकडून मिळालेले पाच हजारांहून अधिक केबल्स (लखोटे) प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे. ‘हिंदू’ने त्यांच्याकडील 5100 पैकी पहिल्या दिवशी 40 केबल्स प्रसिद्ध केल्या. त्यात जुलै 2008 मध्ये मनमोहन सिंग सरकारवर आलेल्या विेशासदर्शक ठरावाच्यावेळी सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षाच्या काही खासदारांना दिलेली कथित लाच आणि त्यासंदर्भात भारतातील अमेरिकन वकिलातीच्या अधिकार्यांनी अमेरिकन सरकारला कळवलेले संदेश अशी माहिती पुढे आली आहे. त्यानंतर केंद्रातील कॉंग्रेसप्रणित आघाडी सरकारची गोची झाली. पंतप्रधानांनी तर यासंदर्भात थेट मला काही माहित नाही, असे सांगितले. आणि नंतर हे आरोप फेटाळून लावले.
भारतासंबंधीच्या केबल्सबाबत ज्युलियन असांजने दिलेल्या मुलाखतीत "Cables are authentic but the contents of the cables may not be correct. They need to be investigated, interrogated.'' असे म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी या केबल्स राजदूतांनी त्यांच्या देशांना पाठविलेल्या आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे, असंही स्पष्ट केलं.
विकिलीक्सच्या गौप्यस्फोटात भारत आणि पाकिस्तानबाबतचीही माहिती उजेडात आली आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची भारताविषयीची काय भूमिका आहे. अमेरिका भारताला सापत्नभावाची वागणूक देताना पाकिस्तानला कसे आर्थिक सहकार्य करते, याचाही विकिलीक्सने पर्दाफाश केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिकेचा मित्र असलेला पाकिस्तान प्रत्यक्षात अमेरिकेने दिलेली आर्थिक मदत भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी वापरतो. अफगानिस्तानातही पाक सैन्य आणि आयएसआय संघटना तालिबानी शक्तींना कशा मदत करतात, याबाबतचे पाकिस्तानातले तत्कालीन राजदूत एनी पॅटरसन यांनी अमेरिकी परराष्ट्र खात्याला पाठवलेली गुप्त तार विकिलीक्सने प्रसिद्ध केली. त्यावरुन पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय पातळीवर बुरखा फाटला. पाकिस्तानबाबत भारत अनेक वर्षांपासून जे काही सांगतो आहे, ते कसे बरोबर आहे, यावरही शिक्कामोर्तब झाले. जगात सर्वात वेगाने अण्वस्त्र निर्मिती करण्याची क्षमता पाकिस्तानकडे असल्याचे विकिलीक्सने म्हटले आहे. पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडली तर दहशतवादी ती केव्हाही भारताच्या विरोधात वापरू शकतात, याची ब्रिटन-अमेरिकेला भीती असल्याचेही या दोन देशांमधल्या परराष्ट्र खात्यांच्या तारा विकिलीक्सने प्रसिद्ध करून उघड केले. सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतावर लक्ष ठेवा, असे परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिटंन यांनी त्यांच्या गुप्तचर विभागाला सांगितले आहे, हेही विकिलीक्सने उघड केले. त्यामुळे क्लिटंन दाम्पत्य भारताचे मित्र आहेत, ही भारताची समजूत कशी चुकीची आहे, हेही स्पष्ट झाले.
26/11 नंतर भारत पाकिस्तानवर हल्ला करेल, अशी भीती ब्रिटनला वाटत होती. हे या केबलने उघड केले. राहुल गांधी यांनी लष्करी तोयबाच्या धोक्याप्रमाणेच हिंदू मूलतत्त्ववादी संघटनांचा देशाला धोका असल्याचे अमेरिकन दुतावासास सांगितल्याचे उघड झाल्यानंतर कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. प्रकाश करात हे त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षातर्फे केंद्र सरकारवर दबाव आणतात हे प्रसिद्ध झाल्यावर विकिलीक्स भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करतो, असा आरोप प्रकाश करात यांनी केला. 26/11 च्या हल्ल²यानंतर कॉंग्रेसने धर्माचे राजकारण केले. हेही विकिलीक्सच्या नवीन केबलने उघड झाले. अमेरिकेचे तत्कालिन राजदूत डेव्हिड मलफोर्ड यांनी 23 डिसेंबर 2008 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला लिहिलेले गोपनीय पत्र विकिलीक्सने प्रसिद्ध केले.
ज्युलिअन असांजे उच्च तांत्रिक दहशतवादी?
वॉशिंग्टन - अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे फोडणा-या विकिलीक्सचा संस्थापक ज्युलिअन असांजे याला उच्च तांत्रिक दहशतवादी ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. या कागदपत्रांमुळे जगभर नाचक्की अमेरिकेने मात्र अद्याप त्याच्यावर कोणते आरोप ठेवायचे, याचा निर्णय घेतलेला नाही, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन यांनी सांगितले.
अमेरिकेच्या एनबीसी या दूरचित्रवाणी वाहिनीच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना बिडेन म्हणाले, की असांजे याने अमेरिकेचे मोठे नुकसान केले असून, इभ्रत धुळीस मिळविली आहे. एवढेच नाही तर जगभरात पसरलेल्या अनेक अमेरिकी नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्याशिवाय अमेरिकी उद्योजकांनाही नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
असंख्य कागदपत्रे उघड झाल्याने, मित्र देशांशी असलेल्या संबंधावरही विरपित परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे, असे सांगून बिडेन म्हणाले, की अमेरिकी नेते जगभरातील विविध नेत्यांची भेट घेत असतात. त्यांच्यातील चर्चा गोपनीय स्वरूपाची असते. या चर्चेचा तपशिल उघड झाल्यास, किती गोंधळ उडेल याची कल्पनाच केलेली बरी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा